कविता :🌷 " निळ्या-निळ्या नभात "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
निळ्या-निळ्या नभात, घन-घन-घनात
घननीळ घनःश्याम प्रकटला गं, गगनात... ।।ध्रु।।
चहु-दिशांनी, रात्रं-दिनी, साद घाली नभात
निळे-निळे नेत्र मिटून दयाघन-हसला-गं-मनात
दया-माया-करुणा सारी उमटली गं हृदयात... ।।१।।
विस्तिर्ण, अवाढव्य, आकाशाची निळाई
जणु कुण्या अंतर्मनाची अद्भुत गहराई
डोकावून पाही कुणी लुकलुकत्या तार्यात... ।।२।।
उसळती गं उंच लाटा, फेसाळत्या सागरात...
पूनवेचा चांदवा दंग खेळ खेळण्या गगनात
हसते गं प्रतिबिंब तयाचे यमुनेच्या पाण्यात... ।।३।।
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply