कविता : 🌷” निरामय-निर्मम “

कविता : 🌷" निरामय-निर्मम "

कविता : 🌷" निरामय-निर्मम "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सारी नाम-स्मरणाची पुण्याई...
आयुष्य-भराची, हीच कमाई...
श्वासा-श्वासात फुले जाई-जुई...
हृदयी निवास विठ्ठल-रखुमाई...

प्रत्येक-जीवातच, ईश्वरीय अंश...
कणाकणात असे भक्तिचा वंश...
कैलास मानसरोवरी जाई चित्त...
तन-मन पावन करी जल-पवित्र

जे जे पिंडी ते सर्व असे ब्रम्हांडी,
धन-दौलतादींची आसक्ती सोडी...
नाव-किर्ती-जमीन-जुमला गाडी...
मृत्यूच्यासमोर सारेच पळ काढी...

झुगारुनी ती षट्-रिपूंची झापडं...
सत्-कर्मांची, घेऊनिया कावड...
जीवा-शिवाची, घातली सांगड...
ॐकार-नादाची मनस्वी आवड...

सरळसोट साधी अशी राहणी...
व्हावी अमृतासम रसाळ वाणी...
जीव जडावा महा-प्रभू-चरणी...
अवघं आयुष्य जावं सत्कारणी...

चंचल-मन-स्थिर शांत-करु-चित्त...
ध्यान-धारणेने होई एकाग्र-चित्त...
नकोत विघ्नं, कोणतीही निमित्त...
पामरा बळ देती, श्री गुरुदेव दत्त...

कशा-कशाची नुरली, आसक्ती...
भक्तिरसामधे चिंब काव्य-पंक्ती...
संत-महंत-जनांची, व्हावी संगती...
या निरामय निर्मम जीवनी तृप्ती...

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!