कविता -🌷 ” निरामय “

कविता -🌷 " निरामय "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १९ ऑगस्ट २०२४
वेळ - दुपारी १२ वाजून ३३ मि.

आई व नवजात बालकातील निरामय बंध
जणू वार्यावर स्वार होऊन दरवळतो सुगंध

भावा-बहिणीच्या अंतरी वसे निरामय माया
बाल-पणीच्या आठवणींचा अत्तराचा फाया

भावा-भावाच्या मनांतर्गत वसे निरामय प्रेम
अबोला-दुरावा टिकतो एक तासभर जेमतेम

बहिणी-बहिणींच्या मनात, मायेचा जिव्हाळा
भेट होवो न होवो, कधी आटणार नाही लळा

पति-पत्नि,प्रियकर-प्रेयसीतील निरामय प्रिती
लटके रुसवे फुगवे,लाडिक लाडी-गोडी किती

प्रत्येक नात्यांमधील कोमल निरामय भावना
मनुष्य-जीवन समृद्ध-संपन्न करतात संवेदना

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!