
कविता - 🌷 " निज-रूप विरले "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
हे नश्वर-जग, जणूकाही होतं जिवंत,
केवळ तुझ्या चैतन्यमय अस्तित्वानं...
तुझी-अनंत-रूपं व तुझी-अनंत-नामं,
कसं करावं बरं गुणगान या पामरानं...
फुला-फुलात, पाना-पानांत चराचरात
दिशा-दिशात कणा-कणात, जगदिशा
सदा-सर्वदा-लाविशी सर्वां, वेडी-आशा
सामावून-व्यापून-सर्व, पूरवीशी-मनीषा
या अंतर-बाह्य-चरा-चरात व्यापून तू रे,
भगवंता, खेळू-नको-असा-लपंडाव-तू रे...
मन-वेडे-दंग-झाले, पूर्ण-सत्य-आकळले...
धुके-लुप्त-झाले, निज-रूप-पुरतेच-विरले...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply