कविता : 🌷” निखळ-हर्ष “


कविता : 🌷" निखळ-हर्ष "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

बारा-मास घेऊन येतात, नवीन-उमेद जगण्यासाठी...
काम-धामाबरोबरच, उत्सवांची सांगड-आनंदासाठी...

हेमंत ऋतू घेऊन येतो श्री दत्त जयंती, मकर-संक्रांत
अवतरतो त्रिमूर्तींचा-अवतार, नकाच होऊ चिंताक्रांत...

संक्रांतीपासूनच होते सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात...
गुलाबी थंडीत, हुरडा-तीळगुळ-गुळ-पोळ्यांवरती ताव !

शिशिर ऋतू आणतो मस्ती, होळीची अन् रंगपंचमीची...
होळीत टाकून, राख होई अप्रिय-नकोशा सर्व स्मृतींची...

विविध रंगात माखून, गरज नुरेल खोट्या मुखवट्यांची...
पूर्णवर्ष रेलचेल-सणावारांची निखळ-हर्ष-लुटण्यासाठी...

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!