कविता – 🌷 ‘ नामजप मंत्र “बावनकशी” ‘

कविता - 🌷 ' नामजप मंत्र "बावनकशी" '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ११ मार्च २०२४

जीवनात एखादा "ध्यास" नक्की हवा ...
त्याच्या जोडीस मनापासून-प्रयत्न हवा ...

मुंगी बनून, चाखता येणार साखर-रवा ...
तपस्या-यज्ञात मात्र नक्की "राम"हवा ...!

साचल्या जेव्हा पापांच्या राशींवर राशी ...
किती जरी केल्या वाऱ्या, प्रयाग-काशी ...

नाम-जपाचा महिमा आहे प्रचंड अगाध ...
श्वासागणिक सततचे नाम-जपणे, साध ...

तेव्हा तारी, नाम-जप मन्त्र "बावनकशी"...
मग त्या मनुजा, चिंताही न-उरे कशाची ...!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!