कविता - 🌷 " नांदते भरभरुन सुख "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ।।
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि,
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नमः:।। 🙏
प्रत्येक घरात असतोच लक्ष्मीचा निवास
तिचा वावर असतो मात्र, विविध रुपात ...
लक्ष्मी वसे वात्सल्य-मूर्ती-आईच्या रुपात
कुटुंबाला सावरणार्या, पत्नीच्या स्वरूपात
कुठे-कुठे लाडक्या-प्रिय लेकीच्या रुपात ...
कधी छोट्या-खट्याळ बहिणीच्या रुपात ...
काही ठिकाणी प्रेमळ आजीच्या स्वरूपात ...
तर कधी चिमुरड्या-गोड-नातीच्या रुपात ...
लक्ष्मीचीच ही रूपं, जरी निरनिराळी असली...
तरी लक्ष्मीच वसत असते, प्रत्येक रुपातही ...
ज्या ज्या ठिकाणी, स्त्रियांना देण्यात येते,
आपुलकीची-मानाची-आदराची-वागवणूक...
जेथे प्रेमभावे राखली जाते, स्त्रित्वाची बूज ...
त्या प्रत्येक घरा-घरात नांदते भरभरुन सुख ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply