कविता 🌷 " नतमस्तक " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
आसमंत सुखद-सुंदर आहे निळे-निळे पाणी व आभाळ आहे हिरवागार निसर्ग आहे प्रसन्नतेचा शिडकावा आहे एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।१।।
हाताशी मुबलक वेळ आहे खेळवायला दोन नातवंडं आहेत हात-पाय-डोकं-दृष्टी शाबूत आहे कुडीमध्ये पंच-प्राण आहेत एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।२।।
तना-मनात संगीत आहे... गळ्यात गाणं गुणगुणत आहे कानात स्वरांची मेजवानी आहे हृदयात शब्दांचं वरदान आहे एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।३।।
जवळपास बागा आहेत हिरवीकंच वनराई आहे... सृष्टी-सौंदर्य निथळत आहे लहान मुलं बागडत आहेत एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।४।।
सुग्रास पौष्टिक आहार आहे जगभरची रसाळ फळं आहेत मनात-पोटात भूक आहे... खाण्या-पिण्याची लयलूट आहे एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।५।।
पोटची दोन-दोन मुलं आहेत ओळखी-पाळखीची मंडळी आहे एका फोन-कॉलच्या अंतरात आहेत स्मरणशक्ती ही शाबूत आहे... एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।६।।
नसानसात अध्यात्म आहे श्वासागणिक नाम आहे... कलात्मकतेचं लेणं आहे सुदृढ-निकोप शरिर आहे... एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।७।।
ईश्वराचा वास आहे-भास आहे परमेश्वर-कृपेची आस आहे सृष्टीदेवीची साक्ष आहे-साथ आहे ॐकाराची स्पंदने आहेत एवढंच खरोखर पुरेसं आहे...।।८।। एवढंच खरोखर पुरेसं आहे... म्हणून कायम नतमस्तक आहे🙏
Leave a Reply