कविता :🌷’ नखशिखान्त-संवेदना ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २९ जून २०२३
वेळ : १० वाजून ४३ मि.
ज्याचं मन निर्मळ पावन
त्यास दर्शन देई दयाघन !
ज्या मनी नाही किल्मिश
त्याच हृदयी वसे जगदिश !
भुकेल्या जीवास देई घास
त्यालाच मिळे अन्न-सुग्रास
दीन-जनां देई मदतीचा हात
त्याच्यासाठी येईल जगन्नाथ !
रात्रं-दिन जे गाळतील घाम,
तेच भक्त, जातील निजधाम !
दुर्बल-जनांची ठेवी जो जाण,
देवच रक्षितो त्याचे पंच-प्राण !
स्वार्थ सोडून, परोपकार करी
त्याच्या-पाठीशी सदैव श्रीहरी
किर्ती-धन-सुख, नसे ज्या खंत
त्याच्यासाठी सर्वत्र उभा भगवंत !
ज्यांनी भक्ति-मार्ग चोखाळला
त्यांचा मुक्ति-पथ सुकर झाला !
जो आहे जळी-स्थळी-पाषाणी
स्वर्ग-पृथ्वी-पाताळी, चक्रपाणी !
भूमी-जल-व्योम व्यापून टाकी
म्हणूनच त्या म्हणती सर्वव्यापी !
मत्स्य-कूर्म-वराहादी दशावतार
खांबातून प्रकटला नृसिंहावतार !
‘वाल्या’सारखा डाकू जो अट्टलं,
नामस्मरणजपे भेटी त्या विठ्ठल !
सुख-दु:ख-मोह-माया-देह नश्वर,
नखशिखान्त-संवेदना आहे ‘ईश्वर’ !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply