कविता – 🌷 ” ध्यास वेडा-खुळा “


कविता - 🌷 " ध्यास वेडा-खुळा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

गोड गुपित प्रीतीचे हे, जरी गंधाळले नव्याने
गंध वेडावतो जीवाला गुंतता तव आभासाने

विरहात न संपणा-या, दिन-रात्रीच्या घटका
मग विरुन जाईल, सारा रोश-मनीचा-लटका

हृदयाच्या गाभ्या-यात, लपलेले मोर-पिसारे
मनाच्या तारांगणात, चमकती चंद्र-सूर्य-तारे

वा-यावर स्वार होऊनी क्षणातच भेट घडावी
स्वप्नातील-कळ्यांची एकेक-पाकळी-उमलावी

ओल्या दव-बिंदूंना, तो नव-स्पर्श हळवा हवा
प्रेमातील सोबतीला करी हा ध्यास वेडा-खुळा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!