कविता : 🌷’ ध्यास ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ४ मे २०२३
वेळ : संध्याकाळी ७ वाजून ४७ मि.
वेणु वाजवूनी सूर छेडू नको
सांजवेळी जीवा वेड लावू नको
थांब कान्हा जरा, जीव झाला खुळा
कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll धृ ll
रात काळी निळी, घनश्याम नीळा
या यमुना जळी गोप गोपी मेळा
खेळ सारे तुझे, हे रुसणे तुझे
वेड लावुनी रे, दूर जाशील का?
कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll १ ll
लक्षणे ही तुझी, जीवघेणी जरी
खुळी मी राधिका, आज झाले पूरी
जीव वेडा पीसा, ध्यास लागे तुझा
हे गोड गुपित, वारा सांगेल रे
कुणी पाहील रे, दृष्ट लावील रे ll २ ll
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply