कविता : 🌷' धावा '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, २ जून २०२४
वेळ : रात्री ११ वाजून ३२ मि.
जरी मूळ स्वभावात अजिबात बसत नाही,
तरी "पराधीन-भावना" पिच्छा सोडत नाही
दर दिवशी पालटणारी, एकूणच परिस्थिती
वर-वर पाहता झकास,श्रीलक्ष्मीची उपस्थिती
पण व्यसनासक्त, अर्धवट वयातच दिशाहीन
सुदृढ असूनही, मानसिक रोगानेच हीन-दीन
असा योध्दा, जो चक्र-व्यूह-भेद करु शकतो,
व्यूहरचना तोडून बाहेर पडण्यात कमी पडतो
त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीकृष्णच हवा
साक्षात् भगवंता वीण कुणाचा करावा धावा ?
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply