कविता – 🌷 ” दोष कुणाचा ? ”     

कविता - 🌷 " दोष कुणाचा ? "      
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

उदारतेचं मूर्तिमंत असं उदाहरण ...
म्हणजेच "सूत-पुत्र-कौंतेय-कर्ण" ...
हाती नसे कुणाच्या पोटी जन्मणं ...

पूर्ण महाभारतात कर्णाच्या इतका,
पराक्रमी-शूरवीर-लढवैय्या योद्धा
शोधूनही कधीच नाही सापडणार ...

दुर्दैवाचा फेरा, कर्णाच्या जन्माच्या
आधी-पासूनच सुरु झाला असावा ...
विशेष वरदान प्राप्त झाले कुंतीला ...

त्यामुळे सूर्य-देव आले मंत्र म्हणता
कुमारी-माता कुंती अन् सूर्य यांचा,
तेजस्वी-मनस्वी-अद्वितीय पुत्र हा ...

तत्कालीन-समाज-टीकेला घाबरुन
कुमारी मातेने रुढींपुढे मान तुकवून
मातृत्व-भावनांना पायदळी तुडवून ...

दुसरं काही करणे, शक्यच नसताना
तिने-मन-मारुन-तिच्या-तान्हुल्याला ...
कायमचे त्यागले नवजात बालकाला ...

गुपचूप सोडलं-अजाणत्या अर्भकास
लाकडी पेटीतून वाहत्या जलाशयात ...
केले"काळं-कृत्य-रात्रीच्या-अंधारात ...

भविष्याचा कोणी काय अर्थ लावावा?
कोणी कुणाच्या कुशीत जन्म घ्यावा ?
ना माहित कुणी, कुणाला दोष द्यावा ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!