
कविता - 🌷 " दोलायमान "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
कधी कधी उगीचच मन झाकोळतं...
अन् मग सगळं काही नकोसं वाटतं
शून्यात तंद्री लावून, एकटक पाहतं...
सदासर्वदा आनंदात डुंबणारं वेडं-मन
हल्ली असं वारंवार दोलायमान होतं...
काय खरं काय खोटं समजेनासं होतं...
असंच अश्रूंनी आभाळ भरून आलं
पण हळव्या आठवणींच्या सावलीनं,
दाटलेल्या काळ्या मेघांना, परतवलं...
आठवणींना शेवटी सोडवलं पावसात...
मोकळंच सोडलं चिंब-चिंब भिजण्यास...
बरसत राहणं तेवढंच, उरलंय भाग्यात...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply