कविता- 🌷 ‘ देव तारी त्यास कोण मारी ? ‘ तारिख – मंगळवार, ५ मार्च २०२४

कविता- 🌷 ‘ देव तारी त्यास कोण मारी ? ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – मंगळवार, ५ मार्च २०२४
वेळ – दुपारी, ३ वाजून ५० मि.

आजीचे कृष्ण-भक्तिचे सुसंस्कार होते मीरेच्या बाल-मनावर …
त्यामुळे मनोमनी तिचा ठाम विचार, कृष्ण हाच ‘एकमेव वर’ !

प्रत्यक्षात मीरेचा विवाह झाला-भोजराज-मेवाडचा-राजकुंवर …
दुर्दैवानं तिचं सौभाग्यच हिरावून घेतलं, लढाईने रणांगणावर !

अजाण, एकाकी मीरेने मग भक्ति-मय-विश्व उभं केलं मनात …
जगाची भ्रांतच नाही, रात्रं-दिन रममाण ती भजन-किर्तनात !

कृष्ण-भक्तित मग्न मीरा बघून, राजपूत राणा करी चीड-चीड …
कसंही करुन तिचा कांटा काढण्या-सोडली लाजलज्जा-भीड …

गाफील मीराबाईच्या गळ्यात घातला, सापाचा हार दुष्ट दिराने …
इजा न करताच हारातील विषारी साप पळाला-ईश्वरीय कृपेने !

मीराबाईच्या दुधाच्या पेल्यात महाभयंकर जहर घातले राणाने,
कसलाही विचार न करता ते प्राशन केले, भाबड्या मीराबाईने …

खात्री करून घ्यावी म्हणून राणा येता, मूर्च्छित पडलेली मीरा …
तडक उठून, दिव्य-भक्तिमय-तंद्रीतच नाचू-गाऊ लागली मीरा !

असा अद्भुत भक्ति-योग की प्रत्यक्ष भगवंत नित्य असे रक्षणास !
त्यामुळे मीरेच्या वधाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, कामच करीनात …

भगवंत-लीला अथांग-अपार, भक्तांच्या कल्याणासाठी कष्ट करी …
विषारी-विषाणू निष्प्रभ होती-कारण देव तारी त्यास कोण मारी ?

🌷@कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆













































































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!