कविता - 🌷 ' दुर्मिळ अशी उर्मी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, ३ एप्रिल २०२४
"भक्ती"ही एक अत्यंत दुर्मिळ अशी उर्मी आहे की ,...
तिच्या वास्तव्यातच होते, अभिजात ऊर्जेची निर्मिती
जेंव्हा भक्ती भुकेच्या पोटी शिरते व उपवास घडविते, ...
उपवासाच्या सात्विक ऊर्जेने तन-मन तृप्त, शांत होते
भक्ती जेंव्हा अन्नात उतरते, जणू जादू घडवून आणते ...
अन्नाचा नैवेद्य दाखविला जाऊन, त्यास प्रसाद बनविते
जेंव्हा ती पाण्यात उतरते, त्याला परम पावन बनविते ...
जल, तीर्थप्रसाद होऊन ते "तीर्थ"असे संबोधिले जाते
भक्ती प्रवासात साथ देऊन, त्या यात्रेलाच पावन करते ...
त्या पवित्र पर्यटनास पुण्यदायी तीर्थ-यात्रा म्हटले जाते
जेंव्हा भक्ति-संगीतात मिसळून, कथा-कीर्तनात पाझरते ...
भक्तिरसाच्या रुपामध्ये तिला भजन-कीर्तन म्हटले जाते
जेंव्हा भक्ति प्रत्यक्ष घरामध्ये नांदते ती प्रसन्नता आणते
घराच्या वास्तुला-वातावरणाला जणू प्रति-मंदिर बनविते !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply