कविता – 🌷 ‘ दुर्गा-रूप ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार, ३ एप्रिल २०२४
वेळ – रात्री १२ वाजून ६ मिनिटे
साल कोणतेही असो, एकच परिस्थिती
दुर्बल समजून दुय्यम वागवण्याची वृत्ती …
जोपर्यंत अन्यायाविरुद्ध पेटत नाही स्त्री,
महिषासुरमर्दिनी-होत, दुर्गा-रूप घेई ती …
विटंबना करणारी विषारी कलुषित प्रवृत्ती,
शब्दाशब्दाने, कृतीने, नजरेतून झोंबणारी …
कधी शत्रूच्या, आप्त-स्वकीयांच्या रूपात !
कधी कोणत्या तरी नातेवाईकाच्या रूपात !
युगा-युगांपासून होतच आलेली विटंबना …
मानवतेवर लागलेला जणू काळा धब्बा !
भयंकर रोग हा समाजाला कीड लावणारा,
अगदी मुळांपासून उपटून टाकायला हवा !
जहरी, सडलेली ही मानसिकता नष्ट व्हावी,
सबला नारी दुर्गा-रूपातच प्रकटायला हवी !
मनोमनी जरी श्रीकृष्णाला साद घातली तरी,
प्रत्यक्षात झाशीची-राणी संचारायलाच हवी !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply