कविता – 🌷 ” दुमदुमली गोकुळ नगरी “

कविता - 🌷 " दुमदुमली गोकुळ नगरी "

कविता - 🌷 " दुमदुमली गोकुळ नगरी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

जलाशयाच्या काठावरी,
जल-तरंगांची देहबोली...
खुलता एकेक पाकळी,
धारा-धारा, राधा झाली...

हळुच चंद्र डोकावला,
चंद्राळलेल्या प्रकाशात...
अवघा यमुना-किनारा,
नख-शिखान्त बहरला...

लोण्या-सम पर्वतही,
नकळत वितळत गेला...
मिलनाच्या ओढीने,
वाराही मंद-मंद झाला...

विलंब झाला म्हणूनी,
पांगल्या गोप-गोपीही...
हुंकार यमुनेच्या डोही,
कान्हा वेणू वाजवी...

ऐकूनी कावरी-बावरी,
राधेची नजर भिरभिरली...
नजरेशी नजर भिडली,
काळजाचा ठाव घेई...

यमुनेच्या साक्षीने प्रीत,
दोन अंतरी प्रकटली...
"राधेश्याम"च्या गजरात,
गोकुळ नगरी दुमदुमली...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!