कविता -🌷 ” दुधाची तहान ताकावर “

कविता -🌷 " दुधाची तहान ताकावर "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १५ ऑक्टोबर २०१७
वेळ - रात्री, ९ वाजून ९ मि.

व्यक्ती तितक्या प्रकृती असती
प्रत्येकाची दु:खही वेग-वेगळी
एरवी मुखवटे घालून फिरतात
बेसावध क्षणी, अश्रू ढाळतात

सहजच गप्पा मारत असता,
दिपावलीचा विषय निघाला ...
एकदम समोरच्या व्यक्तिचा,
चेहराच पांढरा फटक पडला !

"सगळे नातेवाईक परदेशी गेले
एक-एक करुन स्थायिक झाले
लांब-लांबचे काही-जण आहेत
पण स्वतःच्याच विश्वात रमलेले"

"आताशा कोणीच कोणाच्याही
घरी-दारी कधी जात-येत नाही
एकमेकांना दोन-चार दिवसही
कोणी साधं बोलावीत ही नाही"!

"सणाचे भले मोठ्ठे चार दिवस,
कसे घालवायचे, प्रश्नच पडतो ...
लहानपणीचे सारे फोटो पाहून,
एकटाच आतल्या आत रडतो"!

"सांगणार कुणाला हे माझं दुःख
सगळेच आपापल्या नादात दंग
दुधाची तहान ताकावर भागवतो
फोन मधूनच सण साजरा करतो"!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!