कविता - 🌷 " दीपस्तंभ "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
आज आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो, कित्येक महान् स्त्रियांचा
डॉ.आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, मेरी कोम आदी कित्येकींचा
बस-ट्रेन किंवा रिक्षा-चालक असो वा असो थेट राष्ट्रपती--पंतप्रधान-पद
स्त्रिया कर्तृत्वाने भूषवितात, संस्थांचे-न्यायालयांचे-कंपन्यांचे सर्वोच्चपद
आजमितीला हे शक्य होऊ शकंत आहे ते फक्त मजबूत पायाभरणीमुळे
द्रष्टेपणा, विद्वत्ता, बुद्धिमत्ता यांचा वापर करून अखंड मेहनत केल्यामुळे
स्त्री-शिक्षण-प्रणेत्या-सावित्रीबाईंच्या अनंत-अथक-अविरत परिश्रमाने
सर्व-बळ एकवटून, १८४८ साली प्रथमच मुलींसाठी-शाळा सुरू केल्याने
भारतीय महिलांच्या शिक्षणाचा, एक नविनच अध्याय सुरू होऊ शकला
त्यांच्या विचार-मार्गदर्शनाने समाज दूरदृष्टीच्या-प्रगतीपथावर स्थिर झाला
त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगावच्या-माळी-समाजात झाला
वयाच्या नवव्याच वर्षी त्यांचा विवाह १३ वर्षीय ज्योतिबां बरोबर झाला
ज्योतिबांनी त्यांना शिक्षण पूर्ण करुन समाजसेवा करण्याचा सल्ला दिला
समाजद्रोहींच्या सततच्या त्रासाने न खचता, शिक्षणाचा दीप तेवत ठेवला
शिक्षण पूर्ण होताच अन्य स्त्रियांना-मुला-बाळांना-शिक्षण-देणं, सुरू केलं
समाज-घातक-प्रथांच्या-विरोधात-आवाज उठवला-जनतेला-जागृत केलं
आवाका त्यांचा दांडगा, समाजात-स्त्री-पुरुष समानतेचे विचार रूजवीले
त्यांची प्रेरणादायी-कहाणी-आदर्शपणे-जगण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
सावित्रीबाई फुले, समाज-सेवा व सुधारणेच्या भक्कम दीपस्तंभ आहेत
भारतीय इतिहासात त्या आणि त्यांचे योगदान, अमुल्य-अजरामर-आहेत
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply