कविता – 🌷 ” दिव्य-प्रकाशाचा मागोवा ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २५ मार्च २०१७
दुसर्याही पत्नीच्या आकस्मित निधनामुळं,
आमचे आजोबा पार हतबल झाले त्यामुळं,
मानसिक धक्क्याने मनस्थिती होती दुर्बल …
त्यात घरच्या स्त्रीवर्गानी जणू चंगच बांधला
वधू-संशोधनाच्या कार्यात पुढाकारच घेतला
शेवटी त्यांच्या धोशामुळे त्यांनी होकार दिला
आजोबांनी पुन्हा लग्न करण्यास संमती दिली
शांताची नव्यानं घरी आलेली-सावत्र-आईही,
आधीच्या आईचीच जणू नवीन आवृत्ती होती …
ती येता शांताच्या आयुष्यात खळबळ उडाली
शांताची शाळा तर फार पूर्वीच बंद केली होती,
तिच्या तीन भावंडांची व सगळ्या घरकामाची,
संपूर्ण जबाबदारी, एकट्या चिमुरड्या शांताची …
आता शांता रात्रंदिन कामात जुंपली गेली होती
त्यात भरीस भर वाढीव कामाची जबाबदारी,
सतत टोचून बोलणारी नवी सावत्र-आई होती
दैव-गति असं समजून, सर्व सहन करीत होती
पण त्याचबरोबर स्वयं श्रीगणेशा शिकत होती !
शांताची शाळा बंद पण भावंडांची शाळा अखंड
हा कोणता न्याय, त्या भाबड्या जीवाला न कळे
शांता तीक्ष्ण बुद्धिची, नुसते ऐकून सर्व ज्ञान-कण
एखाद्या टिप-कागदाप्रमाणे टिपून करी ती स्मरण …
पण तिचा जात्याच स्वभाव-अत्यंत भक्कम-कणखर,
कधीही कोणत्याही प्रसंगी, जरा सुध्दा ना डगमगणार …
बिकट परिस्थितिनं कितीही हल्ले केले तरी हसतच तिने
दोन-हात केले-कधी कोणत्या कारणे शस्त्र नाही टाकले …
कठीण असूनही त्यातून प्रकाशमय मार्ग शोधून काढत,
तिने त्या दिव्य-प्रकाश-झोताचाच मागोवा घेतला सतत
त्यामुळेच तिच्या चित्त-मन-बुद्धिमत्तेचा, विकास झाला …
प्राप्त झाली त्वरित-योग्य-निर्णय-घेण्याची विशेष क्षमता …
कामाच्या क्षमतेत प्रचंड वाढ व कमालीची सहनशीलता …
अंतरी उजळून ज्ञान-दीप, दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏
Leave a Reply