कविता 🌷 ” दिव्य, निर्मल-अनुभूति “

तारिख – सोमवार, १७ एप्रिल २०१७
कवितेचं नाव-🌷” दिव्य, निर्मल-अनुभूति “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
दिव्यत्वाची अनुभूति …
मनस्वी अशी प्रचिती …
न भूतो न भविष्यति …

ऊठल्या क्षणापासून,
जीवाची थोडी तगमग …
कळत नव्हतं, अंतर्मन …
हे कशामुळं होतं बेचैन …
मुलांशी संवाद साधून,
झालं काहीसं निवांत …

काहीली कमी व्हावी म्हणून,
शितल संतत जलधारां-मधून
स्वानंदे,सचैल,मनसोक्त स्नान …

“शिवोहं”चाच गजर तना-मनात …
जणू कोसळणार्या, ऊंचावरून, 
स्वर्गीय,अद्भुत, धबधब्यासमान …

सहस्र- सहस्र जलधारां स्पर्शती …
सहस्र-सहस्र कमल-दलं उमलती,
सहस्र- सहस्र सहस्रार तेजाळती …

मन, बुद्धि, चित्त,मानस तेजाने भरून,
सहस्ररश्मिंसहित सूर्यादेवांचं आगमन …
संपूर्ण भालप्रदेश लखलखित प्रकाशून …
रक्तवर्ण लालिमा सर्वत्र सहज पसरून …

मन आकंठ आनंदरसाने तृप्त होऊन …
अखंड ब्रह्मांडाचं दर्शन स्पष्ट होऊन,
अंतर-बाह्य काया-पालट जणू होऊन,

सदा निर्मल-निर्विचार-अवस्था प्राप्त 
स्थळ-काळाचे सर्वच देह-भान लुप्त …

शत- शत प्रणाम सर्व गुरूवर्यांना …।
लक्ष-लक्ष आद्यगुरू-चरण-वंदना …।।
🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🌅🕉🌷🙏


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!