कविता – 🌷 ” दिव्य-दृष्टि “

कविता - 🌷 " दिव्य-दृष्टि "
कविता - 🌷 " दिव्य-दृष्टि "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः। ॐ ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम:।।
भवतु भुवन माता संत्ततम सिद्धिदात्री नमो नम:।।

एकूण-सर्वच देवी-स्वरूपांच्या-गुणांचा
समावेश एकवटूनच हा जन्म देवीचा
सिंह-वाहीनी, प्रसन्न-वदना असे देवी
शुभ्र-वस्त्र प्रिय तिज, रूपाने तेजस्वी...

अष्टौ-सिद्धींचं उगम-स्थानच आहे ती
उपासकांवर प्रसन्न, सिद्धी-दाती देवी
आरंभी आदि-पराशक्ति-निराकार होती
रुद्राने मनोभावे आराधना केली तिची...

देवीने अष्टौ-सिद्धी दान केल्या रुद्रासी
त्यामुळे शिवाच्या वाम-अंगी प्रकटे देवी
पृथ्वीतलावर या स्वरूपातील ते "ईश्वर"
म्हणून शिव झाले "अर्ध-नारी-नटेश्वर"

उजवं शिव-शरिर, डावं-शरिर-शक्तिचं
सिद्धीदात्री उगमस्थान, सर्वच-सिद्धिंचं
सिद्धीदात्री-माता हेच, अंतिम-स्वरूप
लोप पावती अडी-अडचणी आपसूक...

सिद्धीदात्री देवी कमळामध्ये विराजमान
डाव्या हातात कमळ, शंख शोभे छान
चार हात तिला, उजव्या हाती सुदर्शन
उजव्या हाती गदा वनराज-असे-वाहन...

एक प्रकारचं सामर्थ्य म्हणजे "सिद्धी"
दात्री म्हणजे विशेष दान देणारी देवी
अनिमा, महिमा, गरीमा, लघिमा आदि
सिद्धी-दाती-देवी म्हणून,"सिद्धीदात्री"

चुका झाल्यानंतरही केल्यास पश्चात्ताप
माफ करते देवी, साधकांचे उपद्-व्याप
सिद्धी देई श्रीदेवी, कृपा करी भक्तांवरी...
देते, दिव्य-दृष्टि जागृत सुषुप्त-अंतर्शक्ति...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!