कविता – 🌷 ” दिव्य-अनुभूती “. तारीख – १३ ऑक्टोबर २०१६

कविता – 🌷 ” दिव्य-अनुभूती “

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारीख – १३ ऑक्टोबर २०१६

आज तिरुमालाचा छानसा फोटो पाहिला-अन् जुन्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला…
काही गोष्टी आपल्यासाठीच जणू पूर्व नियोजित असती-अचानक भेट देणे तिरुपतीला …

मूळ भन्नाट-कल्पना चंद्रकांतभाईंची-चंद्रकांतभाईं म्हणजे एक भला मित्र …
त्यांनी पोंडीचेरीच्या अरविंदाश्रमची, आणली व्हीव्हीआयपी आमंत्रण-पत्रं!
त्यात मुंबई ते पोंडीचेरी रिटर्न तिकीटं-तिथे तारांकित खाणे-पिणे-राहाण्याची सोय
पोंडीचेरीच्या समुद्र-किनाऱ्याची होतीच ओढ-वर बोनस श्रीतिरुपती-दर्शनाचा-अलभ्य योग!
चंद्रकांतभाईंची योजना होतीच मस्तं-मी पाच महिन्यांची गरोदर, म्हणून मनी थोडं द्वंद्व होतं …

शेवटी बहुधा हामी भरली माझ्या बाळांनंचं-ट्रेनचा प्रवास म्हणून उत्सुकतेपोटी धक-धक…
पण आमचे चंद्रकांतभाईं-पक्के-गुज्जूभाई-प्रवासभर खाणं-गप्पा, तोंड हलतं ठेवलं होतं…
एखादी गरती बाई काय ठेवेल अशी बडदास्त-त्यातून पोटुशी म्हणून माझं स्तोम फार जास्त …
एकूण पूर्ण प्रवास फारच आरामाचा,आनंदात …

रेनिगुंटा स्टेशनवरून ऍम्बॅसॅडर कार हायर करून तिरुपतीला पोचलो, स्नानानंतर सहज 
मुख्य मंदिरात चक्कर मारु म्हणून गेलों तर नशीबाने दर्शनाला फक्त २०-२५ माणसं…
आम्हीही केलं चक्रव्यूहासारख्या मार्गानं थेट दर्शन-मुख्य पुजाऱ्यांनी आमचं नाव, गोत्र, कुळ विचारलं…
ते उच्चारुन दो-मशालींच्या उजेडात मस्त दर्शन झालं…साग्रसंगीत पूजाअभिषेकात बालाजीचं-दर्शन झालं…

सुषागात झालेल्या श्रीदर्शनानं, मन प्रसन्न-तृप्त-मनात आलं,उगीच अफवांनी दिशाभूल करीती लोक…
भले मोठ्ठे सुक्या-मेव्याचे लाडू मिळाले प्रसाद म्हणून-सर्वांना प्रसाद द्यायला,जास्त लाडू घ्यायचं ठरलं…

पूर्ण परिसरच फार स्वच्छ व सुंदर व्यवस्थापूर्ण
“सेल्फ-हेल्प”पद्धतीनं शुध्द,चविष्ट खाद्यपदार्थ
सर्व कारभार कौतुकास्पद,चोख व शिस्त-बध्द
दुसऱ्या दिवशी सकाळी, तयार झालो दर्शनास
मंदिराकडे हजारो ओलेत्या माणसांची गर्दी दिसताच 
शांतपणे, शिस्तीत उभी राहिली होती रांगेतच
आम्ही थक्क झालो माझी चक्क”बोलती बंद” …

काल आम्ही येतो काय, स्नान आटोपून सहज म्हणून जातो काय, 
इतकं निवांत नितांत सुंदर “अनुभूती” घेतो काय,सारं जणू काही स्वप्नवत …!

सर्वात मोठा धक्का तर शेवटी होता …काल सुषागात घेतलेलं दर्शन 
व्हीआयपी कोट्यातून बिल्कुल नव्हतं-ते होतं” फ्री-दर्शनम्” अन् …
कालचा दिवसच मुळी-“फ्री-दर्शनम्-डे”होता!

कदाचित यालाच म्हणतात “सुदैव”जे आम्हाला चंद्रकांतभाईंच्या रूपानं,
जणू देव-दूत बनून, मुंबईहून खेचून, श्रीतिरुपती-बालाजीकडे घेऊन आलं 
अद्वितीय, अद्भुत दिव्यानुभव देऊन अंतर-आत्म्याला तृप्त केलं …
अध्यात्मिक पातळीवर समृद्ध केलं, कायमचं स्मृती-पटलावर कोरलं गेलं !!!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏

















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!