कविता : 🌷 ” दिवास्वप्न “


कविता : 🌷 " दिवास्वप्न "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

आयुष्य तसेन् तसेच, जात आहे...
दिडक्या गतिने, नित्य-नियमाने...

हे सगळं-सगळं आपलंच असूनही,
उगीचच परकेपणा का दाटत आहे...!

माणसांच्या ह्या प्रचंड महापूरात,
माणुसकीचाच का हो अभाव आहे...?

जन्मजात नातीगोती जरी वारेमाप,
विचित्र एकांतवास का हा नशिबात...?

जीवनाच्या सा-या-सा-या पायवाटा,
चकव्या-सम का झाल्या उफराट्या...?

मृगजळापाठी सुसाट पळता-पळता,
थकलेला जीव, का येतो मेटाकुटीला...?

अथक धावता-धावता पळभरासाठी,
थांबायला हवे का श्वास भरण्यासाठी...?

जेव्हां-जेव्हां अर्थशून्य भासे हा पसारा,
आयुष्यात मुखवट्यांचा खेळ हा सारा...!

नाच-नाचून, थबकून, वळून पाहताना...
हळूच स्पर्शून जाई वारा झुळझुळताना...!

मिटलेल्या पापण्यांमध्ये, स्वप्न उमटता...
जीव वेडाखुळा का दिवास्वप्नात रमला...?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!