कविता - 🌷 " दिपवून आसमंत सारा" कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
"आरोग्यम् धन-संपदा"हे मनापासून जाणतो आरोग्याची साथ नसेल तर पैसा फोल ठरतो स्वास्थ्यामुळेच जीवनात खरा आनंद मिळतो म्हणून लक्ष्मीसह विष्णुरुप-धन्वंतरीला पूजतो
यंदाच्या दिवाळीला, धनत्रयोदशीच्या दिवशी .. धनाची पूजा आपण करुया ना थोडी वेगळीशी धना बरोबर " सन्मती " सुध्दा मागूया जराशी ... मनातील जास्तीची "हाव-"मग होईल नाहीशी
धनासह सद्-विद्या, सद्बुद्धी देईल श्रीलक्ष्मीपती लाभ होईल सर्वांस सद्-शक्तिसह धन-संपत्ती त्यामुळेच सर्वांना प्राप्त होईल आंतरिक तृप्ती ... अंतर्यामीस्थित-आत्मारामास लाभेल सुखशांती
स्वीकृतीमुळे ना उरेल चिंता-काळजीचा पसारा मनांतरीची किल्मिषे जाता नष्ट पापाचा ढिगारा मग अंतर्मनातील प्रकाश उजळेल चेहरा-मोहरा त्या प्रकाशाने जणू दीपून जाईल,आसमंत सारा
Leave a Reply