कविता - 🌷 " त्रिवार मानवंदना "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, २६ मे २०१७
मन मोहून टाकतो आहे एक लबाड ...
त्याला पाहताच वाटे, मिळालं घबाड ...
नसे त्यास काही काळ-वेळाचं बंधन ...
रोखू शकणार नाही वरपांगी, साधन ...
तो सगळ्या ग्रह-नक्षत्रांचा, महाराजा ...
चाले त्याचीच मर्जी सारे त्याची प्रजा ...
एखाद्या टुकार ढगाने, काढता खोडी ...
तो करतो त्याचीच, पळता भुई थोडी ...
नभीचा तोच आहे अनभिषिक्त सम्राट ...
त्याचाच पृथ्वीवरी व अंबरी झगमगाट ...
तो येता घाबरगुंडीने, ढग पळती सैराट ...
दाहीदिशेला धावतात, फुटेल जेथे वाट ...
रोज दिमाखदार आगमन, करी अपूर्व ...
त्यास लवून मुजरा करती, झाडून सर्व ...
डोळ्यांत प्राण आणूनच, करीती प्रार्थना ...
त्यास अर्घ्य देऊन होते त्रिवार मानवंदना ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🔆
Leave a Reply