कविता 🌷- ‘ त्याला माणूस कधी म्हणू नये ‘

कविता – 🌷 ” त्याला माणुस कधी म्हणू नये “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारीख- ७ सप्टेंबर २०१६

वेळी मदतीचा हात नाकारतो
उलट, पायही खेचतो त्यास,
सहयोगी कधी समजू नये …

दोघात भांडण लावून,
लांबून मजा बघतो त्यास,
मित्र कधीही म्हणू नये …

डोळ्यांवर पट्टी बांधून
न्याय-निवाडा होतो त्यास,
न्याय-देवता म्हणू नये …

अन्यायाकडे डोळेझाक 
अन् गुन्ह्यांकडे करी पाठ त्यास, 
न्यायाधीश कधी मानू नये …

मोठी मोठी वचनं देऊन
गरीबांची करी दिशाभूल त्यास,
पुढारी कधी म्हणू नये …

सेवेच्या नावाखाली
स्वतःची तुंबडी भरतो त्यास,
नेता कधी म्हणू नये …

बाया-बापड्यांना फसवतो
दिशाहीन ही करतो त्यास,
साधू कधी म्हणू नये …

देवा-धर्माच्या नावानं जो
अराजक माजवतो त्यास,
संत कधी म्हणू नये …

मुलीचा गर्भ मारून टाकते 
त्या निर्दयी बाईस,
माता कधी म्हणू नये …

हुंड्यासाठी सुनेला छळते,
लोभांधाने जाळते अशा सासूला,
स्त्री कधी म्हणू नये …

पैश्याच्या लोभापायी 
अपार छळ करणाऱ्यास,
पती कधी म्हणू नये …

पोटची पोरं विकणाऱ्या 
निर्लज्ज, बेरड कसायास,
बाप कधी म्हणू नये …

भोळ्या-भाबड्यांना लुटून 
महाल-माडया उभारतो,
त्याला दानी कधी म्हणू नये ……

काजळ काळ्या कृत्यांनी  
माणूसकीची करतो होळी,
त्याला ” माणूस” कधी म्हणू नये……..

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🕉🌅🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!