कविता 🌷’ तो येतो तेव्हा ‘

कविता 🌷’ तो येतो तेव्हा ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३
वेळ : १२ वाजून २३ मि.

तो येतो अन् येतेच आनंदाची सुखद लहर
त्या सवे येतो अगणित पाना-फुलांना बहर
हर्षित पशु-पक्षी-नद्यांची मंजुळ नाद-लहर

जाणीव होते, श्रावण सखा आल्या-नंतर 
एका-हिरव्या-रंगाच्या किती छटा ढिगभर 
तरी प्रत्येक रंग-छटा अत्यंत मोहक-सुंदर !

छटा-न्-छटा तना-मनास भुरळ घालणारी 
क्षणार्धात डोळ्यांत भरणारी-सुखावणारी
सौंदर्याने जणू नजरेला खिळवून ठेवणारी !

स्वागतासाठी पाना-वेलींचा बांधला असे झुला 
हिरवा-कंच-मखमली जणू गालीचा अंथरलेला
वरुन रंगी-बेरंगी फुलांची वेल-बुट्टी-चितारलेला

श्रावण सख्यासाठी अवघी सृष्टी नव-वधू-गत
नख-शिखांत साज-शृंगार, नटून-थटून सज्ज !
हिरवा शालू, हाती वरमाला-नाकात शोभे नथ !

हिरवागार निसर्ग, अंगी लेवून पिवळं-धम्म ऊन
रिमझिम श्रावणसरीं, वाजे हलकी-फुलकी धुन 
हर्षानंदाला उधाण-वरुन सणासुदीची धाम-धूम

🌷@तिलोत्तमा विजय लेले

🙏🕉️🔆




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!