कविता – 🌷 ‘ ती ‘

कविता - 🌷 ' ती '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ४४ मि.

ती हसली की वाटे नाजुकशी जाईजुई
कोमल इतकी, उन्हाने कोमेजून जाई

स्वच्छ गोरीपान नितळ वर्ण सोन-सळी
छोटसं तिचं नाक, वाटे जणू चाफेकळी

मन-मोहक हास्य, दिसे जणू कुंदकळी
दोन्ही गालांवर पडायची, मोहक खळी

ती येता, आई मीठ-मोहऱ्या ओवाळी
म्हणायची, दृष्ट न लागो वेळी-अवेळी

तिचा लांब-सडक घन-दाट, केश-संभार
काळ्या-सावळ्या घना-सम, काळा-शार

रूपानं इतकी देखणी की न ठरे नजर
गरज नसे तिला करायची कुंकू-पावडर

जणू विधात्यानंच केलेली खास करामत
बघून तिला"दुखे पोट"अशी दयनीय गत

जणू महाराणी, दिसे साध्या धूत-वस्त्रात
एकदम उठूनच दिसे, ती हजारो जणात

लाखात-एक-ती-म्हणजे माझी प्रिय ताई
तिच्याशिवाय बालपण, पूर्ण होणार नाही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!