कविता - 🌷 " ताईचं लग्न "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, १८ एप्रिल २०२४
वेळ - रात्री, ९ वाजून ३२ मि.
ही गोष्ट आहे मी तान्ही असतानाची ...
मी शेंडेफळ आणि ताई सर्वात मोठी
आई कामात व्यस्त, मग मी ताईकडे
ती नाचत-नाचत मला फिरवी चहूकडे ...
तिच्या हातास रग लागून-कधी फुटे रडे
दुसऱ्या कुणाकडे दिले की मग मी रडे ...
इतर कुणी घेतलं की नाही आवडायचं ...
धसमुसळं वागणं पसंत नाही पडायचं ...
त्यामुळं लगेच माझं "भोकांड"पसरायचं ...
शेवटी ताईच्या-कडेवर विराजमान व्हायचं ...
अचानक काय झालं होतं, माहित नाही ...
ताई माझ्या वाट्याला, मिळायचीच कमी
एक दिवस खूप गडबड गोंधळ होता घरी
जसा म्हणतात असतो, एखाद्या लग्न-घरी ...
माझीच ताई निघाली होती तिच्या सासरी
पण काहीच समजेना रडत का होती सारी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply