कविता – 🌷 ” तर काय बहार येईल “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २४ नोव्हेंबर २०१६
तर काय बहार येईल …
चुटकीमधे, काही वर्षे मागं जाऊन,
काल-यंत्राचा योग्यसा वापर करून,
अविस्मरणीय तेे क्षण,
परत जर जगू शकलो,
तर काय बहार येईल …
काही गोष्टी, ज्या हुकल्याच होत्या,
पुनःआत्मसात करता आल्या त्या …
तर काय बहार येईल …
जुन्याच,कोऱ्या-पाटीवर जर पुन्हा,
नव्यानं गीरवता येईल, श्री- गणेशा …
तर काय बहार येईल …
आपल्या- परक्यातला फरक
जर, नीट समजून घेता आला,
अन् अंमलात आणता आला,
तर काय बहार येईल …
हिरा आणि गारगोटी मधून,
अनमोल हिरा जर गवसला,
अन् तो सांभाळताही आला,
तर काय बहार येईल …
काड्या- काड्या जमवून,
अपार मेहनत कर-करून,
बनवलेल्या घरट्याला जर,
घर-पण परत देता येईल,
तर काय बहार येईल …
छोटया गोडशा पिल्लांना,
उबदार कुशीत कवटाळून,
गुंगवून, गुंतवून ठेवता येईल,
तर काय बहार येईल …
आयुष्याच्या सोन-सकाळी,
हुशार पाखरांसम उंच भरारी,
जर आभाळात झोकून देऊन
सहजा – सहजी घेता येईल,
तर पुनः-पुनः बहार येईल …
पुनः पुनः बहार येत राहील …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply