कविता :🌷’ तरंग ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३
वेळ : ९ वाजून २७ मि.
चांदण्यात चंद्रमा हरपला
टिमटिम चमके तारा
फडफडला वा-यावर अलगद
उडवी खट्याळ हा पदरा || धृ ||
अजुनी त्याची गाठ न पडली
इथवर आले पाणी
जळी स्थळी राधेला भासे
कान्हा वाजवी मुरली
पाण्यावरती तरंग उमटला
साद घाली किनारा || १ ||
गंगेच्या पाण्यात पहुडली
ती हंसांची जोडी
तिच्या कोमल पंखांवरती
पिलं कोवळी वसती
वात्सल्याची ओढ अनामिक
मायेचा हा फुलोरा || २ ||
जादूच्या फसव्या नगरीत
क्षण सुखाचे आले
गो-या गालांवर लज्जेचे
गोड गुपित हे बोले
प्रितीच्या रंगाने न्हाला
मदनाचा इशारा || ३ |
जागोजागी लपाछपीच्या
जोवर असती वाटा
तशा ठिकाणी कसे जगावे
जीवनाच्या या व्यथा
अंत:करणी शब्द उमटला
व्यर्थ सारा पसारा || ४ ||
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply