कविता -🌷 " तफावत "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ९ ऑगस्ट २०२४
वेळ - सकाळी, १० वाजून १५ मि.
आज व काल यातील तफावत
आता वेळ नाही, सर्वच कार्यरत
पूर्वी सुध्दा सगळे कामं करायचे
तरी सुखदु:खात सामिल व्हायचे
साधासा झुणका-भाकर हा बेत
कांदा व खमंगसा ठेचा समवेत
तो आनंद त्यावेळी खातानाचा,
आभाळापेक्षाही मोठा असायचा...
चपला नव्हत्या, बूटसुध्दा नव्हते
नव्हतेच झक-पक कपडे व लत्ते...
तरीही कसलीच फिकीर नव्हती,
जगण्यात आगळीच, धुंदी होती...
सध्या सगळेच झालेत, श्रीमंत...
तरीही वाडे गेलेत पडून-झडून
सगळी-नाती-गोती, माया-प्रेम
जणू अत्तरासमान, गेलंय उडून...
जणू संपले, हसणे-खिदळणे...
पाहुण्यां-रावण्यांचे येणे जाणे,
दसरा, पाडवा, दिवाळीमधले
ते सुखद क्षणांचे, सोने लुटणे!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply