कविता -🌷 " ठसा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ३१ जुलै २०२४
वेळ - रात्री, ९ वाजून १९ मि.
बोरकर यांची,'दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती,
तेथे कर माझे जुळती’या समर्पक पंक्ती
कै.बाळ गंगाधर टिळकांना, लागू होती
शिक्षेला न जुमानता चळवळ उभारली
स्वातंत्र्य-चळवळ हा 'कर्मयोग' म्हणजे,
प्रत्यक्ष कृती-कारण-योगच असे म्हटले
जनतेचे प्रिय लोकमान्य टिळक, यांची
एक-ऑगस्टला, मालवली प्राणज्योती
उभे आयुष्य, देश-स्वातंत्र्याला वाहिले
धाडसी क्रांती-वीरांना, मार्गदर्शन दिले
ते स्वातंत्र्य-चळवळीचे शिल्पकार होते
ते " गीतारहस्य" ग्रंथाचे रचनाकार होते
सुरु करुन सार्वजनिक उत्सवाची-प्रथा
लाखोंच्या संख्येने सहभाग घेई जनता
स्वातंत्र्यवीर सावरकरां-समान वीरांना
संपूर्ण दिले सहाय्य-प्रोत्साहन-पाठींबा
त्यांची स्मृती देते, देश-भक्तिचा वारसा
उमटवून शत-लक्ष-लक्ष-मनांवरी ठसा
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply