कविता -🌷" झेप "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ॐ अपराजितायै नम: ।। ॐ क्रियाशक्तयै नम: ।। ॐ उमायै नम: ।।
भारतीय संस्कृतिचा यथोचित गर्व
अर्वाचिन वेदांचे-ज्ञान, वेद अथर्व
नवरात्रीचं अत्यंत शुभ असं हे पर्व
दश-दिनी हे विजयश्रीचं-पावन-पर्व
रामे रावण-वध केला-लंकेचा पराजय
तुंबळ-युध्दात दुर्गाशक्तिचा दिग्विजय
अज्ञातवासानंतर पांडवांचा पुन: जय
दहाव्या दिवशी विजयादशमीचा-जय
दशानन युद्ध हरला म्हणून, "दशहरा"
नवरात्रीत देवीने वधिले, महिषासुरा
विजयादशमीस जयाचा-हर्ष सुरवरा
शस्त्र-अस्त्र-पूजेसाठी महत्वाचा दसरा
रामलीलेतून रावणाचं-गर्व-हरण करून
जीवनात क्लेशांचे, पापांचे दहन करून
पांडव लढले झाडावरून, आयुधं काढून
त्यांचे हक्क मिळवले दिग्विजयी होऊन
असत्यावर सदैव विजय, सत्याचा
पांडवांनी पराजय केला कौरवांचा
अंतिम जय नऊरूपात दुर्गा-देवींचा
लंकेशावर दिग्विजय श्रीरामचंद्राचा
खलं-प्रवृत्तींचा होतोच समूळ संहार
शौर्याचा-विरतेचा सदा जयजयकार
उपवासा नंतर, मेजवानीचा उपहार
नव-दुर्गांचे मानवांवर कोटी उपकार
नव-रात्रींच्या-तपस्येने, पुण्य मिळते
साधकाच्या मनातील पाप नष्ट होते
अध्यात्मिक-ज्ञान, प्रगती दृश्य होते
"ज्ञात"मधून" अज्ञाता"कडे झेप घेते
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply