कविता : 🌷” झुळुक “


कविता : 🌷 " झुळुक "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कळले नाही कसे, अचानक हरवले चांदणे...
डोळे भरून आले अन् आकाश वाटले ठेंगणे...

सांज पसरू लागता पक्षांचा थवा होई सैराट,
झाड मुक्याने ऐकते पाखरांचा किल-बिलाट...

वाटा सा-या गिळून, अंधाराचे साम्राज्य पसरे,
प्रकाशाचे पंख छाटून मग धुके हातपाय पसरे...

मग चाहूल ती अंतरीची मूग गिळून गप्प बसते,
काळीज हेलावणारे मूक हुंदके कुणी न ऐकले…

धगधगते ठेवूनही विझले अंतरमनातले निखारे,
झुळुक हळूच वा-याची फुंकर घालण्यास आहे...

🌷 तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!