कविता – 🌷 ” ज्ञान-अमृत “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – बुधवार १४ फेब्रुवारी २०२४
वेळ – दुपारी, २ वाजून १९ मि.
वसंत ऋतूच्या स्वागतासाठी …
वसंत-पंचमी ऋतुराजासाठी …
वीणा-वादिनी, देवी सरस्वती …
संगीत-वाणी-कला-बुद्धिदाती !
शिक्षण आणि ज्ञानाची देवता …
शुभ्र-वसना-श्रीसरस्वती माता …
कोणत्याही कार्यामध्ये सफलता,
सखोल ज्ञानाचीच आवश्यकता …
श्रीसरस्वती मातेचे शुभाशिर्वाद,
ज्ञानार्जनास जरुरीचे-निर्विवाद …
सरस्वती-देवीच्या कृपा-प्रसादे,
ज्ञानार्जन निर्विघ्नपणे पूर्ण होते …
माणूस हा, आजन्म विद्यार्थी …
देवी-पूजेत भाव हवा निस्वार्थी …
मनोभावे पूर्ण-आराधना देवीची …
प्रसन्न होत देवी-ज्ञान-अमृत देई …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply