कवितेचं नाव-🌷” ज्ञान-दिप जेव्हा उजळला “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ३ जानेवारी २०१६
खेळ असे मांडला …
अंतर्यामी आपल्या …
कळेना आपल्याला …
मुंगी होऊनी चाली …
हळूच ती अंगावरी …
समजे आपल्याला,परी …
शरीरी, रक्त संचार करी …
चोवीस तास भ्रमण करी …
न कळे, आपल्याला परी …
वारा हळूच स्पर्श करी …
येई सुखदशी शिरशिरी …
वीस वायूंचा संचार शरिरी …
न कळे आपल्याला परी …
झाडे हलती, फुले डोलती …
नेत्र पाहती, अन सुखावती …
अंतरचक्क्षु जे अनुभवती …
न आकळे परी प्रत्येकासी …
फुलांचा मधुर सुगंधं …
नित्यच करीतसे धुंद …
अंतर्मनीचा दिव्य परिमळ,
ना येतसे परी, प्रत्येकास …
सप्त सूर अन अगणित श्रुती …
तन- मनास गुंगच करती …
प्रणवाचा तो दिव्य नाद …
न अनुभवा येई प्रत्येकास …
नवं- रसांचा स्वादं …
रसना घेई हमखास …
अंतरीचा अनोखा रसं …
चाखंण्या न मिळे, दरेकास …
सूर्य- चंद्राचा प्रकाश …
उजळे अवघ्या चराचरासं …
अंतरंगातील दिव्य-प्रकाश …
उजळून टाकी अज्ञानासं …
खेळ असा हा रंगला …
आत्माराम त्यात दंगला …
तमाम तमाचा, निचरा झाला …
ज्ञान- दिप जेव्हा उजळला …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply