कविता : 🌷 ” जाळे ” बुधवार, तारिख : २२ फेब्रुवारी २०२४

कविता : 🌷 ” जाळे “

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २२ फेब्रुवारी २०२४
वेळ : १२ वाजून १० मि.

जगाची रीत उफराटी
प्रेम-गंगा वाहते उलटी 

आई-बाप जीव सांडती
माया सांडिली वाळवंटी

एकतर्फी कारभार सारा
हकनाक वाढला पसारा

मामला आतल्या आतच
रक्तबंबाळ करी जीवास

नाठाळाचे नादी न लागणे
कर्तव्यास कधी न चुकणे

ज्याच्या त्याच्या नशीबाने
बरे-वाईट होणे, न टळणे 

जे जे होईल, ते ते पहावे
कशातच अधिक न गुंतावे

अळवापरि अलिप्त रहावे
चिखलाकडे दुर्लक्ष करावे 
गरजेनुसार छाटून टाकावे
जे जहरी ते पूर्ण नष्ट करावे 

जागोजागी मोहाचे वेटोळे
सतर्क नसता, करी वाटोळे

पापी-दुष्ट-जनास टाळावे
मति-भ्रष्टास, माफ करावे 

राग-लोभास स्थान न द्यावे 
सदैव नाम-स्मरणात रमावे

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆













Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!