कविता : 🌷’ जाणीव ‘

कविता 🌷 ‘ जाणीव ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १९ जून २०२३
वेळ : ०८ वाजून ५४ मि.

असं का होतं माणसं गेली की,
त्यांची खरी ‘किंमत’ जाणवते
त्यांच्या ‘नसण्यानं’ होते बेचैनी
विचारानं मनाची घालमेल होते !

बेफिकीर वृत्तीनं वर्तमान जातो
जाताना सोबत सुखालाही न्हेतो 
बंद डोळ्यांना जाणीवही नसते !
जेव्हा ती होते वेळ गेलेली असते !

कधी वाटतं ते मायाजाल असावं,
ज्यात भुरळ पडून भरकटत जावं 
मन-तन गुरफटून भानही हरपावं !
जणू भूल पडून सर्वच धूसर व्हावं !

जन्मा-जन्मांची पुण्याई कामी यावी 
सुखाने चक्क पायांशी लोळण घ्यावी 
हुशार देखण्या पतीची साथ लाभावी
प्रेम-लाड-कौतुकाची बरसात व्हावी !

कुणा दुष्ट-काळ्याबेर्याची दृष्ट लागावी,
मोकाट जनावरा-समान वृत्ती पलटावी !
सारासार-बुद्धीही काम करेनाशी व्हावी,
चुकीची झापडं, गांधारी-सम गत व्हावी !

पश्चात्तापाने फारसं काही बदलत नाही
गेलेला सुवर्ण-काळ आणता येत नाही
झालेल्या चुकांची जाणीव जातच नाही
बेगडी-मुखवटा फार काळ टिकत नाही !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆













Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!