कविता : 🌷 ” जर तर… “


कविता : 🌷 " जर तर... "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

मनाचा आवेग अचानक मंदावला जर,
अन् जगण्याचं भान भानावर आलं तर...

भन्नाट वारं-त्रेधा-तिरपिटच नशिबात-जर,
भर उन्हाच्या प्रहरी, चांदवा उरी आला तर...

मना सुखाचा लळा-जिव्हाळा लागला जर,
शब्दांच्या गंधाळण्याने चंदनगंध-पसरला-तर...

क्षितिजा पलीकडे उन्हे खुणावू लागली जर,
सूर्य तळपता, कमळ-मिठीत बंदी भ्रमर तर...

निःस्वार्थ-प्रेम-पूर्तता-करण्या अदृश्य झालं जर...
मनात-डोळ्यात-आर्तताच झिरपत-राहील-तर...

अनवट-विचार-तरंग, अधांतरी-तरंगू-लागले-जर...
धुन-गुणगुणत तंद्रीतच अलगद-पहाट-झाली-तर...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!