कविता - 🌷' जणू जग जिंकले '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
खरोखर सुदैवाचा-भाग्याचा-प्रयत्नांचा,
हा ठेवा, जणू खणखणीत बंदा रूपया
ही भाग्य-संपदा नशीबी नाही ज्यांच्या
त्या सर्वां वाटे भाग्यशालींचा फार हेवा
प्रत्यक्षात झीज ही सतत होतंच राहते
म्हणून वयापरत्वे शरिर-व-मन थकते
सदैव मेंदूचे, शरीराचे, मनाचे सगळे
विभाग स्वास्थ्यपूर्ण कार्यक्षम असणे
वय वाढूनही विस्मृतीचा त्रास न होणे
ही अजिबात लहान-सहान गोष्ट नव्हे
सर्व गोष्टी लक्षपूर्वक करणे शक्य होणे
दृष्टी-श्रवण शारिरीक क्षमताही जपणे
थोडक्यात नाकावर चष्मा, कानात यंत्र
लावून फिरण्याची गरजच न भासणे
व्यवस्थित चावायला-शोभेला-हसायला
दंतपंक्तींची उपस्थिती असणे महत्त्वाचे
गति मंद असूनही सदैव कार्यक्षम असणे
तारुण्यातील दुर्लक्षिलेला छंद जोपासणे
माणसं जमवणे अन् माणुसकीला जपणे
ज्यांस जमले त्यांनी अक्षरशः जग जिंकले
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply