कविता : 🌷’ जगण्याचा खरा आनंद ‘

तारिख – २४ डिसेंबर २०१६

कवितेचं नाव-🌷” जगण्याचा खरा आनंद ” …
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले

हल्ली आपण बऱ्याचदा ऐकतो, पाहतो …
वयस्क लोकांना मानसिक आजार होतो,
त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रासही होतो …

त्यात प्रकार जरी बरेच असले,
तरी एक “कॉमन-फॅक्टर”म्हणजे,
एकाकीपणा,जीवनात पोकळी होणे,

“आपण कोणालाही नकोच आहोत”
असे मत होणे,चुकीचा समज असणे …

त्यातच जर जीवनाचा- जोडीदार,
कालवश होऊन,गेला असेल सोडून …
तर ह्या धक्क्यातुन सावरून,जीवन 
पूर्ववत जगणं,कठीण होऊ शकतं …

मुंबई सारख्या मेट्रो-सिटीत,
जागेची टंचाई खास करून …
मध्यम-वर्गाला न परवडणारे,
जागांचे भाव,गगनाला भिडलेले …

लोन जरी मिळालं,तरी”ईएमआय “चा हप्ता …
म्हणजे “नाकापेक्षा,मोती जड”असावा तसा…
दरमहिना पगारातून,२०-२०वर्षे भरणे हप्ता …

शेवटी,या सगळ्याचं मानसिक दडपण,
जुन्या व नव्या दोन्ही पिढ्यांना वाटणं,
साहजिकच, यावर उपाय मात्र एकच …

स्वतःला ज्यात निर्भेळ आनंद मिळतो,ते शोधणं …
किंवा,जे करतो आहोत,त्यातून,आनंद मिळवंणं …
स्व-आत्मा-रामास नित्यआनंदि अवस्थेत ठेवणं …

हे ज्याला जमलं,त्याला कोणताही विकार,
मानसिक वा शारीरिक,स्पर्श नाही करणार …

ज्यांना आधीच रोगानं ग्रस्त केलंय,

त्यांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांनाच,
मग एक मोठं आव्हानच,उभं ठाकतं …
ते नक्कीच,पेलता येतं,जर संस्कार,

असतील मौलिक,भर- भक्कम,
मॉरल्स आर क्रिस्टल-क्लिअर …

” आपलं माणूस “हवंच असणं …
त्या आपल्या व्यक्तीला जपणं …
हे आपलं परम -कर्तव्य मानणं …

जरी ही तारेवरची कसरत करावी लागली,
तरी ” पुनर्वास “सारख्या एखाद्या ठिकाणी,

भेट दिल्यास अनेक दुर्दैवी मुलां-मुलींचे,
आई- वडील काय- काय दिव्यं करतात,
कोण-कोणत्या अग्नी-दिव्यांतून जातात,

अशा मुलां- मुलींना,हसत, मोठं करतात …
त्यांचं आयुष्य ” सुखावह ” व्हावं म्हणून,

किती आणि कसे धडपडत असतात …
वैयक्तिक,सामाजिक सर्वच पातळ्यांवर,
खूप त्याग करून,हसत-मुखानं जगतात …

जर जुनी पिढी,जेव्हा ती ” नवीन “होती,
करू शकली, करू शकते,करू शकणार …

तर तेच”आता जुन्या”झालेल्या पिढीसाठी,
आताची नवीन- पिढी का नाही करणार?
खात्रीनं, नवीन- पिढी नक्कीच करणार …

कारण,

आत्ताचा प्रत्येक क्षण, पुढच्याच क्षणी,
त्याच्या भूतकाळात रूपांतरित,होणार …
त्याप्रमाणे, नवीन पिढीही काही वर्षांनी,
जुन्या पिढीत रूपांतरित होणारच आहे …

हे सूर्य-प्रकाशाइतकं स्वच्छ आहे
हा सृष्टीचा प्राथमिक-नियम आहे …

ते लवकरात लवकर,स्विकारणं,
नक्कीच चांगलं व भलेपणाचंच…

सर्वच पिढयांसाठी,भविष्यातील
आगामी पिढीसाठी सुद्धा हे एक 
योग्यसं उदाहरण,कोवळ्या वयात,
मनावर, नीट कोरलं जाऊ शकतं …

जी गोष्ट हजारदा बोलून, 
परिणामकारक नाही होत,
तीच गोष्ट,समोर जिवंत उदाहरण
पाहून,साधू शकते,योग्य परिणाम …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!