कविता - 🌷 " जगणं खूप देखणं आहे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
जीवन खूप सुंदर आहे ...
जगणं खूप देखणं आहे ...
जगाकडे कसे पाहावे,
प्रत्येकाची पसंत आहे ...
ठेवू जसा " दृष्टीकोण " ,
तशीच दुनिया भासेल ...
ती जर दुःख-दायी वाटत असेल,
तो तिचा नसून,नजरेचा दोष असेल...
दिवस येतो नवीन बालकासमान,
निरागस, निरामय, सुंदरसा छान....
त्याला जसं घडवू, तसाच तो घडेल...
त्याला जसं साकारू तसाच साकारेल...
त्याला जसं संस्कारु, तसाच तो बनतो...
प्रत्येक"नवागत"दिनाला कसं हाताळतो,
त्याचं आगत-स्वागत कसं करतो,
त्याला हळुवार भावना दाखवतो,
की जीवनाची"रखरखीत"बाजू दर्शवतो,
त्या कोवळ्या-कोंभाला, जपतो, फुलवतो...
की टाकून देतो दाबून, दडपून, गुदमरवून...
भावी आयुष्याची दिशा ठरते, याचवरून...
प्रत्येक नवीन दिवस, असतो एकेक पुनर्जन्म...
नवीन सुवर्ण-संधी-जगण्याची, चुका सुधारुन...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply