कविता : 🌷 ‘ चौफेर दिसे प्रतिबिंब शिवाचे ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : १८ फेब्रुवारी २०२३
वेळ :. १० वाजून १० मि.
शिव-शक्तीस समर्पित दिन हा अति-पवित्र
शिव-पार्वती विवाह म्हणून ‘महा-शिवरात्र’ !
पुष्प, चन्दन, भस्म, जलाभिषेक व बिल्वपत्र
झळकतो वैश्विक उर्जेचा, प्रचंड स्रोत सर्वत्र !
अथक प्रयत्नान्ती भगीरथ घेऊन आला,
थेट स्वर्गातून पृथ्वीवर आणले गंगेला !
शंकराने त्वरित जटेत धारण केले तिला,
म्हणून ‘गंगाधर’ नावानं ओळखला गेला
अमृत-मंथनात चौदावं रत्न जहरी विष निघालं
भोळ्या शंकरानं ते ‘हलाहल’ प्राशन करुन टाकलं
सृष्टीवरील भयाण संकटाचं तत्काल निवारण केलं
तेव्हापासूनच ‘नीलकंठ’ हे नावही त्याला मिळालं
शिव-तांडव नृत्य जगात आहे सुप्रसिध्द
निसर्गही हवं ते देतो भरभरून मुक्तहस्त
कधी कोपला तर मात्र होऊन तो क्रुद्ध,
थैमान घालून तांडव-नर्तन करतो संत्रस्त
शिव-शंकर-भोलेनाथ, निसर्गाचं जणू प्रतिकात्मक रूप खास !
सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळं, भूकंप यांनी सृष्टीचा विनाश
त्रिलोचन-शिव तिसरा डोळा उघडून तांडव करतो विनासायास
एक निसर्गाचं ‘रौद्र रूप’, दुसरं ‘रूद्र-निर्मित’ भयंकर सर्वनाश!
कैक पवित्र शिवालयं अत्यंत दुर्गम भागात उभी राहिली
अमरनाथ, केदारनाथादि तीर्थक्षेत्रं पर्वत-कुशीत वसली !
भीमाशंकर, तुंगारेश्वर आदि घनदाट अरण्यात विसावली
निसर्ग-संरक्षणामुळे मानवी-अस्तित्वाची पताका टिकली !
‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे विशेष प्रतिक आहे निसर्गाचे,
त्रिनेत्र, भालचंद्र, गंगाधर, नीलकंठ व रुद्रादि नाव तयाचे !
पशू-पक्षी, वृक्षवल्ली, वनराई, नद्या, झरे व अवघी सृष्टी,
संवेदनशिल मनात चौफेर पडेल प्रतिबिंब शिवाचे दृष्टी !
संवेदनशिल मनात चौफेर पडेल प्रतिबिंब शिवाचे दृष्टी !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply