कविता - 🌷" चैतन्य " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले तारिख - 19 ऑक्टोबर 2024
19 ऑक्टोबर 1920 रोजी रोह्याला, पांडुरंग शास्त्री आठवले हे चैतन्य अवतरलं मनुच्या माशासारखं पाचही खंड व्यापून ज्ञान-दान-यज्ञाचं कार्य अविरतपणे केलं
तत्वज्ञान हा विषय पुस्तकी नसून, दैनंदिन जीवनाला देव-सन्मुख करणारा राजपथ भक्ति म्हणजे नसे केवळ कर्मकांड, भगवंतापासून विभक्त नाही तोच खरा देवभक्त
प्रत्येक मनुष्याच्या हृदयात स्थित आहे भगवंत म्हणूनच माणसाचे शाबूत अस्तित्व " सर्वस्यचाहं हृदि संन्निविष्ट "अर्थात तो विश्व-नियंता परमेश्वर कायम स्वरूपी स्थित
" अहं ब्रह्मास्मि " हे महा-वाक्य म्हणजे जणू सामान्य-साधकांची हक्काचीच काठी मनात ठाम निर्धार हा की आमच्या समवेत आहे अशी महा-शक्ति जी चालवते सृष्टी
"वैश्विक स्वाध्याय परिवारातून" अध्यात्मिक-ज्ञान सोपं करून भक्तिचं समाजीकरण मनुष्य-गौरव-प्रदाता-दादांना आजच्या "मनुष्य गौरव दिनी" शत-शत-लक्ष-लक्ष वंदन
Leave a Reply