कविता – 🌷 ‘ चारी मुंड्या चीत ‘

कविता - 🌷 ' चारी मुंड्या चीत '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २० एप्रिल, २०२४
वेळ -  रात्री, १२ वाजून ४६ मि.

अगतिकता प्रेमापोटीची
अगतिकता कर्तव्यापोटी

अगतिक परिस्थितीपोटी
अगतिकता दुर्बलतेपोटी

अगतिकता वात्सल्यापोटी
अगतिकता उठा-उठी

अगतिकता व्यसनापोटी
अगतिकता चिंतेपोटीची

अगतिकता अनाठायी
अगतिकता अकारणी

अगतिकतेपोटीच अराजक
उपाय नाही साधक-बाधक

पेच असा की सुटका नाही
काय करावे, सुचतही नाही

अगतिकता डोके वर काढी
अन् चारी मुंड्या चीत करी

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!