
कविता - 🌷 " चाफा दरवळला "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
काहीच न बोलता, जणू मौनात
नकळत बरसले चांदणे अंतर्मनात...
कानोसा घेतच थबकली पायवाट
रमत-गमत चालली ही रम्य पहाट...
कधीतरी लपून छपून नजरेची भेट
मग काळजाचा ठोका चुकला थेट...
तिन्ही सांजा होता मन हळवे झाले
मनात आनंदाचे निर्झर निरंतर वाहे...
मनाला जरी बांधले होते दावणीला,
तरी हिरवा चाफा हृदयींच दरवळला...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply