
कविता : 🌷 " चतकोर सुख "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
सुख सामोरे येता, दु:खाने पळवाट काढली...
नभ येता दाटून, मग ओंजळ सुखाने भरली...
मळभ जाता पळून, ओंजळ भरते पावसाने...
नकळत अंतरंग मोहरते एकेका थेंबा-थेंबाने...
ओसरता रणरणतं ऊन, सुखांची सावली येते...
शीतल झुळूक वा-याची, अलगद स्पर्श करते...
ओझरत्या हळुवार स्पर्शाने, स्पंदनांनी झंकारले...
मन ओढावले, अलवार उड्या मारतच झेपावले...
कमल-दलातील भ्रमराने, जणू मधु प्राशन केले...
चतकोर सुख तत्क्षणी, जणू मजसाठी खोळंबले...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply